पुणे महानगरपालिका मध्ये 10 वी, 12 वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज. PMC Recruitment
PMC Recruitment 2024 : नमस्कार मित्रानो पुणे महानगरपालिका मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एकूण 681 पदाकरिता भरती निघाली आहे. हि भरती दहावी, आणि 12 वी पास उमेदवारांसाठी आहे. जे तरुण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हि बेरोजगार आहेत अशा तरुणांना हि एक चांगली संधी आलेली आहे.
या लेखामध्ये आपण युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत कोणकोणती पदे आहेत, तसेच त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे, वेतन, अर्जासाठी आकारली जाणारी फी याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या सेवेमध्ये एक पद नसून अनेक पदे आहेत. एकूण 681 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही करू शकतात.
एकूण असणारी पद संख्या – 681 पदे. PMC Recruitment 2024
🔖 नोकरीचे नाव –
विविध युवा प्रशिक्षण पदे.
यामध्ये विविध प्रकारचे युवा प्रशिक्षण पदे देण्यात आलेली आहेत हे पदे महाराष्ट्र सरकार मार्फत भरण्यात येत आहेत.
🔖 शैक्षणिक पात्रता
मित्रानो वरील पदासाठी जर शैक्षणिक पात्रता आपण पाहिली तर 12 वी पास, 10 वी पास, तसेच डिप्लोमा, आय. टी. आय., सर्व शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण, या सर्वापैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे PMC Recruitment 2024
🔖 वयोमर्यादा किती लागेल.
वरील पदांकरिता उमेदवारांचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असावे लागेल.
🔖 लागणारी फीस
यासाठी अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही.
🔖 नोकरीचे ठिकाण.
सर्व पदाकरिता पुणे महानगरपालिका येथे नोकरी करावी लागेल.
🔖 अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक –
सर्व उमेदवारांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करावा लागेल, त्यानंतर भरलेला अर्ज हा ग्राह्य धरला जाणार नाही.
🔖 अर्ज सादर करण्यासाठी पत्ता.
पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर पुणे
🔖 लागणारी कागदपत्रे
- संबंधित शैक्षणिक पूर्तता असलेले, म्हणजेच सर्व पास मार्कमेमो.
- आधार कार्ड
- एम्प्लॉईमेंट कार्ड.
- टी. सी
- MS-CIT असेल तर द्या.
- पॅन कार्ड
- खाते क्रमांक
- कास्ट सर्टिफिकेट ( जात प्रमाणपत्र )
- जात पडताळणी प्रमाणपत्र
- 2 पासपोर्ट साईज असलेले फोटो
- रहिवाशी प्रमाणपत्र
वरील सर्व कागदपत्रे उमेदवारकडे असणे आवश्यक आहे.
मित्रानो सर्व पदे हि तात्पुरत्या स्वरूपात असुन कंत्राटी पद्धतीने भरून घेतली जात आहेत. यावर जर वेतन पाहिले तर तुमच्या शिक्षणिक पोस्ट नुसार महिन्याला अनुदान स्वरूपात वेतन देण्यात येणार आहे.
असा करा अर्ज. PMC Recruitment 2024
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वर login करा.
- त्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल.
- नंतर आधार ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP जाईल.
- तुम्ही OTP व्यवस्थित टाकल्यानंतर नंतर तुम्हाला तुमचे ऍड्रेस टाकावे लागेल.
- तुमचे नाव हे आपोआप आधारवर जे आहे ते येईल
- संपूर्ण पत्ता टाकल्यानंतर ईमेल टाका.
- नंतर मेल वर जाऊन ऍक्टिव्हशन on करा.
- त्यानंतर मित्रानो पात्रता टाका.
- तुमचा अर्ज संपूर्ण व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल
- तो तुम्ही सांभाळून ठेवा, पदाबाबत माहिती तुम्हाला मेसेज द्वारे कळविण्यात येईल.