भारतीय रेल्वे विभागात 8113 जागासाठी मेगाभरती, असा करा अर्ज. Railway Recruitment Board

भारतीय रेल्वे विभागात 8113 जागासाठी मेगाभरती, असा करा अर्ज. Railway Recruitment  

Railway Recruitment Board : नमस्कार मित्रानो भारतीय रेल्वे विभागा मध्ये विविध पदाकरिता एकूण 8113 जागासाठी महाभरती निघाली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण जे नोकरी च्या शोधामध्ये आहेत अशांना हि एक चांगली संधी आलेली आहे.

आपण या लेखामध्ये संपूर्ण पदाची नावे, पदांची संख्या, लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, फीस, आणि अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. या जाहिरातीमध्ये, 1) कमर्शियल तिकीट सुपरवाइजर, 2)  स्टेशन मास्टर 3) गुड्स ट्रेन मॅनेजर 4) ज्युनियर अकाउंट असिस्टंट 5) सिनियर क्लर्क लिपिक टायपिस्ट अशी पदे देण्यात आलेली आहेत चला संपूर्ण माहिती पाहूया. Railway Recruitment Board

🔖 एकूण पदांची संख्या – 8113 RRB 

🔖 पदाचे नाव, संख्या आणि शैक्षणिक पात्रता

1) कमर्शियल तिकीट सुपरवाइजर –

या पदाकरिता एकूण 1736 पदे भरून घेण्यात येणार आहे, तसेच या पदाकरिता जर शैक्षणिक पात्रता पाहिली तर कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक आहे.

2) ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट –

या पदाकरिता एकूण 1507 इतक्या जागासाठी भरती घेण्यात येत आहे. तसेच मित्रानो या पदाकरिता जर शैक्षणिक पात्रता पाहिली तर यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक आहे.

3) गुड्स ट्रेन मॅनेजर – Railway Recruitment Board

मित्रानो गुड्स ट्रेन मॅनेजर या पदाकरिता एकूण 3144 जागासाठी भरती निघाली आहे. तसेच यासाठी जर शैक्षणिक पात्रता पाहिली तर कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4) ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिंग 

वरील पदाकरिता एकूण 1507 जागासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच यासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा आणि हिंदी व इंग्रजी संगणकवरील टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असावा.

5) सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट –

मित्रानो सिनियर क्लर्क ( लिपिक ) कम टायपिस्ट पदासाठी एकूण 732 जागा देण्यात आल्या आहेत यासाठी लागणारी शिक्षणिक पात्रता जर पाहिली तर उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा लागेल तसेच तो हिंदी आणि इंग्रजी मध्ये कॉम्प्युटर टायपिंग उत्तीर्ण झालेला असावा.

🔖 वयोमर्यादा –

वरील सर्व पदाकरिता वयोमर्यादा पाहिली तर 1 जानेवारी 2025 रोजी

  • कमीत कमी 18 वर्ष असावी.
  • आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असावा लागते.
  • तसेच SC आणि ST साठी सर्व पदावर 5 वर्ष सूट दिली आहे.
  • तसेच OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष सूट दिली आहे.

🔖 नोकरी करण्याचे ठिकाण.

सर्व पदाकरिता नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर, जॉईंनिंग ही तुम्हाला कुठेही देण्याचा अधिकार त्यांनी राखून ठेवला आहे.

🔖 अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक –

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर आहे, त्यानंतर केलेले अर्ज हे स्विकारले जाणार नाहीत.

  1. अर्ज भरल्यानंतर परीक्षेच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील
  2. अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेत स्थळावर जावे लागेल त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकणार आहात
  3. संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहेब
  4. ऑनलाईन अर्ज करताना चुका झाल्या तर तो अर्ज बाद करण्यात येईल
  5. दोन अर्ज भरले असतील तर 1 बाद करण्यात येईल
  6. Photo अपलोड करताना फोटोचा बॅकग्राऊंड हा पांढरा असावा.
  7. Photo च्या खाली तारीख टाकलेली असावी
  8. सही ही निळ्या शाईच्या पेण ने करावी.

वरील सर्व नियम हे अर्ज करत असताना पाहणे महत्वाचे आहे. Railway Recruitment Board

🔖 अधिकृत वेबसाईट

🔖 जाहिरात पहा 

Leave a Comment